भाविकांसाठी आनंदाची बातमी; आता तुम्ही झाला साईंचे व्हीआयपी भक्त, संस्थानच्या 'या' निर्णयामुळं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण - SAI BABA GENERAL DEVOTEES
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 4, 2025, 10:48 PM IST
शिर्डी : पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला सामान्य दर्शन रांगेतील पहिल्या दोन भाविकांना मुख्यमंत्र्यांबरोबर पूजेचा मान मिळतो. त्याच धर्तीवर साईबाबा (Sai Baba) संस्थाननेही सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या दोन भाविकांना (Sai Baba General Devotees) आरतीला पुढे उभे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याची माहिती, साई संस्थानच्या वतीनं देण्यात आली आहे.
भाविकांना आरती करण्याची संधी मिळणार : साईबाबांच्या मंदिरात दररोज चारवेळा आरती होते. त्यातील माध्यन्ह आरती, संध्याकाळी होणाऱ्या धुपारतीला भाविकांना संधी दिली जाणार आहे. तसंच राहिलेल्या काकड आरतीबाबत अजून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. फक्त तीन आरतीलाचा भाविकांना संधी दिली जाणार आहे. साईबाबांच्या मंदिरात आरतीपूर्वी साधारण चाळीस मिनट अगोदर दर्शनरांग बंद करण्यात येते. यावेळी दर्शन रांगेत जे पुढे असतील अशा दोन भाविकांचा साई समाधीजवळ पुढे उभे राहून आरती करण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती यावेळी गाडीलकर यांनी दिली.