मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद हे सर्वात आवडते सेलिब्रिटी जोडपे आहेत. दुबईत नवीन वर्ष साजरे करून हृतिक आणि सबा मुंबईला परतले आहेत. 5 जानेवारी म्हणजेच रविवारी हे जोडपे मुंबई विमानतळावर दोघेही एकत्र दिसले. यावेळी हृतिकनं सबाच्या खांद्यावर हात ठेवला होता. पापाराझींनी रविवारी पहाटे मुंबई विमानतळावर हृतिक आणि सबा पाहिल्यानंतर, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढले. आता हृतिक आणि सबा यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबई विमातळावर हे जोडपे कॅज्युअल आउटफिट्समध्ये दिसले. यावेळी हृतिकनं काळ्या रंगाची टी-शर्ट, जॅकेट आणि पँट परिधान केली होती. यावर त्यानं ब्लॅक स्नीकर्स आणि कॅप घातली होती. हृतिकचा हा लुक खूप खास होता. यात तो खूप देखणा दिसत होता.
हृतिक रोशन आणि सबा आझाद स्पॉट झाले मुंबई विमातळावर : याशिवाय सबानं यावेळी बॅगी ट्रॅक पँटसह निळ्या आणि पांढऱ्या रंगसंगतीची शर्ट परिधान केला होता. यामध्ये ती सुंदर दिसत होती. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे दुबई व्हेकेशनमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये हृतिक हा पूर्वाश्रमी पत्नी सुझान खान, सबा, अर्सलान गोनी, रिहान रोशन, उदय चोप्रा आणि नरगिस फाखरीबरोबर दिसला होता. अनेकदा हृतिक हा पूर्वाश्रमी पत्नी सुझान खानबरोबर दिसत असतो. यावेळी त्याच्याबरोबर त्यांची गर्लफ्रेंड सबा देखील असते.
हृतिक रोशनचं वर्कफ्रंट : हृतिक आणि सबा कधीही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. ऑक्टोबरमध्ये या जोडप्यानं त्यांच्या नात्याची तीन वर्षे साजरी केली. या क्षणावर शिक्कामोर्तब करण्यासाठी, हृतिकनं सबाबरोबरचा फोटो शेअर केला होता. या पोस्टवर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 'हॅपी ॲनिव्हर्सरी पार्टनर 1.10.2024 सबा आझाद.' दरम्यान हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणबरोबर 'फायटर' चित्रपटामध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता त्याच्याकडे 'वॉर 2' आहे, यामध्ये तो जूनियर एनटीआरबरोबर दिसणार आहे.
हेही वाचा :