ETV Bharat / sports

क्रिकेटच्या मैदानावर पैशांचा पाऊस... नोटा लुटण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड; पाहा व्हिडिओ - NOTES ON CRICKET GROUND

क्रिकेटच्या मैदानात फलंदाजांकडून चौकार-षटकारांचा पाऊस पडल्याचं आपण नेहमीच ऐकतो, पाहतो. मात्र ठाण्यात एका सामन्यात चक्क पैशांचा पाऊस पडल्याचं समोर आलं आहे.

Rain of Notes on Ground
क्रिकेटच्या मैदानावर पैशांचा पाऊस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 5, 2025, 5:27 PM IST

ठाणे Rain of Notes on Ground : क्रिकेटच्या मैदानात फलंदाजांकडून चौकार-षटकारांचा पाऊस पडल्याचं आपण नेहमीच ऐकतो, पाहतो. मात्र ठाण्यात एका सामन्यात चक्क पैशांचा पाऊस पडल्याचं समोर आलंय. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मैदानावर नोटांचा पाऊस : वास्तविक मैदानावर फलंदाजाची फटकेबाजी पाहून एका प्रेषकानं मैदनात धाव घेऊन त्या फलंदाजावर 500 च्या नोटांचा पाऊस पडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण-भिवंडी मार्गावरील भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालाय. तर दुसरीकडे भारतीय चलनाचा भर मैदानात अपमान झाल्याची टीका नेटकऱ्यांमधून होत आहे.

क्रिकेटच्या मैदानावर पैशांचा पाऊस (ETV Bharat Reporter)

कोणत्या स्पर्धेत घडली घटना : दरवर्षी प्रमाणे यंदाही कोनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात 70-70 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही क्रिकेट स्पर्धा भाजपाचे कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील यांच्या वतीनं आयोजीत करण्यात आली. तीन दिवस सुरु असलेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघानी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धेचं कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी फलंदाजी करत फटेकबाजी करुन उदघाटन केलं होतं.

नोटा गोळा करण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड : या स्पर्धेच्या शेवट्याचा दिवशी दोन संघात क्रिकेट सामना रंगात असतानाच मैदानात पवन नावाचा फलंदाज जोरदार फटकेबाजी करुन चौकार, षटकार लगावत त्यानं 35 धावा केल्या होत्या. त्याची फलंदाजाची पाहून प्रेषक विकास भोईर यांनी मैदानात धाव घेऊन चक्क पवनच्या अंगावर नोटांचं बंडल भिरकावत अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला. दरम्यान, फलंदाज पवन याच्या अंगावर नोटांचं बंडल भिरकावत अक्षरशः नोटांचा पाऊस पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर काल रात्रीपासून भलताच व्हायरल झाला. मैदानात नोटांचा पाऊस पाहून प्रेक्षकही या नोटा गोळा करण्यासाठी मैदानात धावले. त्यानंतर सर्व नोटा गोळाकरुन त्या पवन याला देण्यात आल्या. मात्र दुसरीकडे भारतीय चलनाचा भर मैदानात अपमान झाल्याची टीका नेटकऱ्यांमधून होत आहे.

हेही वाचा :

  1. एका रनाची किंमत... 9999 धावांवर आउट झाला स्मिथ, ठरला दुसरा बॅट्समॅन; तर प्रसिध ठरला पहिला गोलंदाज, कसं?
  2. 13 महिन्यांनंतर पाहुण्यांविरुद्ध 'T20 स्टाईल'नं जिंकला वनडे सामना; 'कीवीं'ची मालिकेत आघाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.