Priyanka Gandhi Detain : महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसच आंदोलन; प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात - काँग्रेस आंदोलन मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
दिल्ली - महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली ( Congress Protest Against Inflation )आहे. देशभरात बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, नागपूर याठिकाणी कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी निषेध केला जात आहे. दिल्लीतही काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखला असून, राहुल गांधी, प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi Detain ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.