मुंबई - युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता कोळीनं नेपाळी बॉयफ्रेंड वृषांक खनाल लग्न केलंय. सुमारे 13 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, तिनं महाराष्ट्रातील कर्जत येथील ओलिअँडर फार्म्समध्ये लग्न केलं आहे. प्राजक्ताच्या लग्नात जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते. 25 फेब्रुवारी रोजी, प्राजक्तानं वृषांक खनालबरोबरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये फक्त लग्नाची तारीख 25.02.25. लिहिली. यासोबतच तिनं पोस्टमध्ये हार्ट आणि नजर डोळ्याचे इमोजी शेअर केले आहेत. वृषांक खनालनं सप्टेंबर 2023मध्ये वेस्ट व्हर्जिनियामधील कॅम्पिंग ट्रिप दरम्यान प्राजक्ता कोळीला लग्नासाठी प्रपोज केलं होत.
प्राजक्ता कोळीच्या लग्नातील फोटो व्हायरल : लग्नातील प्राजक्ताच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, तिनं लग्नात अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेला लेहेंगा घातला होता. ती पारिजात पॅटर्न आणि पिचवाई पेंटिंगनं सजवलेल्या सोनेरी लेहेंग्यात खूप सुंदर दिसत होती. तसेच वृषांकनं आडवारी शेरवानी परिधान केली होती. तसेच त्यानं डोक्यावर पगडी घातली होती. याशिवाय त्यानं डोळ्यावर सनग्लास लावला होता. यात तो खूप सुंदर दिसत होता. लग्नाच्या फोटोंमध्ये, हे जोडपे एकत्र सात फेरे घेताना खूप आनंदी दिसत आहे. आता या जोडप्याचे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. सोशल मीडियावर प्राजक्ता आणि वृषांकवर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
प्राजक्ता आणि वृषांकबद्दल : प्राजक्ता आणि वृषांक बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडप्यानं पहिल्यांदा 2023मध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली. यानंतर दोघेही चर्चेत आले होते. दरम्यान या जोडप्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, प्राजक्ता अलीकडेच रोहित सराफबरोबर 'मिसमॅच्ड सीझन 3'मध्ये काम केलं आहे. ही वेब सीरीज खूप लोकप्रिय झाली होती. या सीरीजमध्ये प्राजक्तानं डिंपल आहुजाची भूमिका केली होती. ही सीरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. तसेच प्राजक्त कोळीचं मोस्टली सेन नाव एक युट्यूब चॅनेल आहे. दुसरीकडे वृषांक हा नेपाळचा असून तो एक वकील आहे.
हेही वाचा :