Uddhav Thackeray FB Live Video : माझी अडचण वाटत असेल तर मी दोन्ही पदाचा राजीनामा द्यायला तयार - उद्धव ठाकरे - उद्धव ठाकरे व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर त्यांनी शिवसेनेला दिलेल्या थेट आव्हानानंतर पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी अखेर आज फेसबुकच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. तुम्हाला माझ्या विषयी जर अडचण असेल तर मला हेच सांगायला हवे होते. मी माझा राजीनामा स्वतःहून दिला असता इतकेच काय जर पक्षप्रमुख म्हणूनही जर माझी अडचण वाटत असेल तर मी दोन्ही पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे मात्र तुम्ही समोर येऊन हे मला सांगायला पाहिजे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही समोर येऊन सांगा मी पण सोडायला तयार आहे मला मुख्यमंत्री पदाचा मोह नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन हे बंडखोर आमदारांना केले आहे.