Cloudburst Like Rain Satara: सातार्‍यातील वाई, जावळी तालुक्यात ढगफुटीसदृष्य पाऊस; वेण्णा चौकाला तलावाचे स्वरूप - जावळी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 30, 2022, 9:46 AM IST

सातारा - सातार्‍यातील वाईसह जावळी तालुक्यातील मेढा परिसरात ढगफुटीसदृष्य पाऊस ( cloudburst like rain in Wai and Javali taluka ) झाला. विजांच्या कडकडाटात झालेल्या तुफान पावसामुळे मेढ्यातील वेण्णा चौकाला तलावाचे स्वरूप आले ( Venna chowk turn into Lake ) होते. रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. सातार्‍यातील पाचगणी, मेढा, वाई, कवठे, बोपेगाव परिसरात झालेल्या तुफान पावसामुळे रस्ते जलमय ( Roads flooded in satara ) झाले होते. वाई तालुक्यातील कवठे, बोपेगाव, शिरगाव येथील शेतजमिनी देखील वाहून गेल्या आहेत. पाचगणी आणि मेढा बाजारपेठ जलमय झाली. अनेक वर्षात असा पाऊस झाला नाही, असे वयोवृध्दांनी सांगितले. पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेल्या चिखलामुळे मेढा बाजारपेठेतील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.