Clash Between Two Residents : भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या गेटबाहेर काढण्यावरून दोन रहिवाशांमध्ये तुंबळ हाणामारी; पाहा VIDEO - Clash Between Two Residents

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 19, 2022, 2:22 PM IST

Updated : Sep 19, 2022, 3:30 PM IST

भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या गेटबाहेर काढण्यावरून दोन रहिवाशांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली (Clash on Removing stray dogs from society) आहे. कुत्र्यावरून हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद (Clash between two residents in Thane) झाला. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले, अन पोलिसांनी तक्रार दाखल करत तपास सुरु केला. बदलापुर पश्चिम भागातील हेंद्रेपाडा परिसरातील श्रीकृष्ण इस्टेट सोसायटी आहे. या सोसायटी मधील रहिवासी दीपक रामपरिया हे रोज भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालत असत. त्यातच गुरुवारी रात्रीच्या सुमारास याच सोसायटी मधील रहिवासी असलेल्या जिया मिश्रानी यांनी भटक्या सोसायटीच्या गेटच्या बाहेर कुत्र्यांना खाऊ घाला, असे दीपक रामपरिया यांना सांगितले. परंतु दीपक रामपरिया यांनी रागाच्या भरात जिया मिश्रानी यांच्यासोबत वाद घातला. भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या गेटबाहेर काढण्याच्या कारणावरून झालेला हा वाद शिवीगाळ आणि हाणामारीवर पोहचला. त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहचला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला (Clash Between Residents incident captured on CCTV) आहे.
Last Updated : Sep 19, 2022, 3:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.