Chintamani Mandal workers beat devotees मुंबईत चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भाविकांना मारहाण, घटनेचा व्हिडीओ समोर - भाविकांना मारहाण घटनेचा व्हिडीओ समोर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईमध्ये अडीच वर्षांनंतर गणेशोत्सव (Mumbai Ganesh Festival) निर्बंधमुक्त वातावरणात साजरा केला जात आहे. यामुळे भाविकांकडून विविध मंडळाच्या गणेश दर्शनासाठी गर्दी केली जात आहे. गणेश मंडळांकडून दरवर्षी भाविकांना धक्काबुक्की करणे, मारहाण करणे आदी घटना घडतात. यंदाही पहिल्याच दिवशी असाच प्रकार उघडकीस आला आहे. चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या (Chintamani Ganeshotsav Mandal) गणेशाचे दर्शन घेण्यास आलेल्या एका भाविकाला मंडळाचे ४ ते ५ कार्यकर्ते बेदम मारहाण करत ( Mandal workers beat devotees) असल्याचा व्हिडिओ (Video viral) समोर आला आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या दादागिरीला चाप लावण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे.