Decision Made by Women Activists Video : काही झाले तरीही आम्ही उद्धव ठाकरे यांना साथ देणार : महिला कार्यकर्त्यांनी केला निर्धार - उद्धव ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद येथील शिवसेनेच्या ( Shiv Sena Party ) मेळाव्यानंतर ( After Shiv Sena Meeting ) महिला पदाधिकाऱ्यांन काही झाले तरी उद्धव साहेबांची साथ सोडणार नाही, असा निर्धार ( Decision Made by Women Activists ) महिला शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे औरंगाबाद ( Aurangabad city ) दौऱ्यावर आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या मेळाव्यात महिला पदाधिकारी उत्साहात सामील झाल्या होत्या. शहरातील पक्षातून शिंदे गटात गेलेल्या आमदारांसोबत काही पदाधिकारी, नगरसेवक गेले असले तरी महिला पदाधिकारी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून, 2024 मध्ये पूर्ण बहुमत घेऊन उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील, असा निर्धार महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरे ( Shiv Sena youth leader Aditya Thackeray ) यांच्या मेळाव्यात आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.