दुर्दैवी.. कीटकनाशकं फवारलेली डाळिंबं खाल्ल्याने १०० मेंढ्यांचा मृत्यू.. मेंढपाळांना अश्रू अनावर - १०० मेंढ्या पडल्या मृत्युमुखी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15835665-thumbnail-3x2-mendhya.jpg)
विजयनगर (कर्नाटक) : हागरीबोम्मनहल्ली तालुक्यातील हमपासागरा गावात कीटकनाशक फवारण्यात आलेले डाळिंब पीक खाल्ल्याने १०० हून अधिक मेंढ्या मरण पावल्या ( 100 sheeps died ) असून, ३० मेंढ्या आजारी पडल्या ( sheeps died after consuming pesticide-laden crops ) आहेत. या मेंढ्या बन्निकल्लू गावातील करीबसप्पा, टी. कोत्रेश, सी. वीरेशा आणि मंजुनाथ करीबसवा सज्जी यांच्या आहेत. हांपसागरा गावाजवळ मेंढपाळ मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी कीटकनाशकाची फवारणी करण्यात आलेले डाळिंब पिक खाऊन 100 हून अधिक मेंढ्या गंभीर आजारी पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. 30 मेंढ्या आजारी पडल्या असून, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्यावर उपचार केले. शेकडो मेंढ्या गमावलेल्या मेंढपाळांना अश्रू अनावर झाले आहेत.