...म्हणून आषाढी वारीत महिला मोठ्या प्रमाणात होतात सहभागी - विठ्ठल
🎬 Watch Now: Feature Video
वारीचा इतिहास पाहिला तर त्यात स्त्रियांचा लक्षणीय सहभाग दिसून येतो. भारतीय संत परंपरेतही स्त्री-संतांची मोठी संख्या आहे. यामध्ये मुक्ताई, जनाबाई, सखुबाई, सोयराबाई, कान्होपात्रा, मीराबाई व बहिणाबाई अशी अनेक नावे सांगता येतील. संसाराचा गाडा तीन आठवड्यांसाठी बाजूला ठेवत सुरुवातीपासूनच स्त्रिया वारीत सहभागी होत आल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे वारीची सर्वसमावेशकता आणि समानता.