MLA Bhaskar Jadhav Drive Bus : ...अन आमदार भास्कर जाधव यांनी चालवली बस - भास्कर जाधव यांनी चालवली बस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14156681-575-14156681-1641895272218.jpg)
रत्नागिरी - शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेचे सभागृह गाजवताना आपण पाहिले आहेच. पण, आमदार भास्कर जाधव बसही चांगली ( MLA Bhaskar Jadhav Drive Bus ) चालवतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल ( Video Viral ) होत असलेल्या व्हिडिओत भास्कर जाधव यांच्या हाती बसचे स्टेअरिंग पहायला मिळत आहे. भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील कार्यालयात त्यांच्या एका उद्योजक मित्राने सोमवारी (दि. 10 जानेवारी) कंपनीसाठी नवीन बस घेतली. या बसचे उद्घाटन नारळ फोडून करण्याचा आग्रह या मित्राने भास्कर जाधव यांना केला. त्यानंतर आमदार जाधव यांनी केवळ नारळच फोडले नाही तर बसची टेस्ट ड्राइव्हदेखील घेतली. त्यावेळी बस आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यालयापासून चालवत चिपळूण शहरात फेरफटका मारला. चिपळूण शहरात भास्कर जाधव बस चालवत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.