विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद-भ्रम अमंगळ; पाहा वारीतील भान हरपणारे खेळ - संत
🎬 Watch Now: Feature Video
ऊन, वारा, पावसातही वारकरी पंढरीच्या वाटेनं चालत असतो. माऊली नामाचं टॉनिक घेतल्यानं त्याला कंटाळा कधीच येत नाही. दिंडीत रिंगण, मृदंग, टाळ, विणेकरी, तुळसी वृंदावन, ठेका, फुगडी, हातावरच्या फुगड्या, झिम्मा फुगडी, तीन फुगडी, भोई फुगडी, फेर, काटवट खना, पाऊल फुगडी, कमरेवर हात ठेवून ताल असे नयनरम्य खेळ खेळले जातात. या खेळात गरीब, श्रीमंत, स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध अशा सर्व भेदांचा विसर पडतो अन् आनंदाच्या डोही आनंद तरंग उमटतात...चला वारीत खेळले जाणारे खेळ पाहुयात....