श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरूच राहणार, निर्बंध कडक होणार - विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरू
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर (सोलापूर) - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर श्री. विठ्ठल - रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. मात्र, कोरोना संदर्भातील निर्बंध कडक राहणार आहे. तर, येत्या मकरसंक्रांती निमित्ताने विठ्ठल मंदिरात कोणत्याही प्रकारची वस्तू प्रसादीका भाविकांना घेऊन जाता येणार नसल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.