ETV Bharat / sports

AFG vs ENG सामना पावसात वाहून गेल्यास 'या' संघाला फायदा, कोणाचं नुकसान? - CHAMPIONS TROPHY 2025

लाहोर इथं होणारा अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना पावसामुळं रद्द झाल्यास ग्रुप बी चं सेमीफायनल समीकरण काय असेल? जाणून घ्या.

Semi Final Qualification Scenario
अफगाणिस्तान क्रिकेट संघ (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 26, 2025, 12:27 PM IST

लाहोर Semi Final Qualification Scenario : बांगलादेश आणि पाकिस्तान क्रिकेट संघांनंतर आता इंग्लंडही चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडू शकतो. सलग दोन पराभवांना सामोरं गेल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तसंच दुसरीकडे, जर इंग्लंडला आणखी एक पराभव पत्करावा लागला तर त्याची उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यताही संपुष्टात येईल. आज त्यांचा सामना अफगाणिस्तानशी होईल, 16 महिन्यांपुर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती झाली तर त्यांना पुन्हा मोठे घाव बसू शकतात.

इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर जाणार? : ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत; त्यांचा एकमेकांविरुद्धचा दुसरा सामना 25 फेब्रुवारी रोजी होता पण तो पावसामुळं वाया गेला. पण दोघंही प्रत्येकी एका विजयासह गुणतालिकेत मजबूत स्थितीत आहेत. तर इंग्लंड आणि अफगाणिस्तान प्रत्येकी एक सामना गमावल्यानं गटातील पॉइंट टेबलमधील टॉप-२ मधून बाहेर पडले आहेत. आज त्यांचा दुसरा सामना 26 फेब्रुवारी रोजी एकमेकांविरुद्ध आहे.

इंग्लंडसाठी महत्त्वाचा सामना : जर इंग्लंडनं हा सामना गमावला तर या आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याचं त्यांचं स्वप्न जवळजवळ भंग होईल. कारण सलग दोन पराभव इंग्लंडला तळाशी नेईल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान त्यांच्या पुढं असतील कारण त्यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. तथापि, यानंतर, सर्व संघांचा एक सामना शिल्लक राहील. पण इंग्लंडनं पुढचा सामना जिंकला तरी त्यांना कोणताही फायदा मिळणार नाही. कारण त्यांचे तेव्हाही फक्त दोन गुण असतील. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा एक सामना रद्द झाल्यामुळं आणि एक सामना जिंकल्यामुळं त्यांचे प्रत्येकी तीन गुण आहेत. तसंच हा सामना देखील पावसात वाहून गेल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिलं जाईल, अशा परिस्थितीत इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचे प्रत्येकी 1-1 गुण होतील त्यामुळं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग सुकर होउ शकतो, तर इंग्लंड आणि अफगाणिस्तानला त्यांचा पुढील सामना मोठ्या फराकनं जिंकल्यास आणि इतर सामन्यांचे निकाल त्यांच्या बाजूनं लागल्यास त्यांना फायदा होईल.

2023 ची पुनरावृत्ती होणार? : जर आपण रेकॉर्ड्सवर नजर टाकली तर इंग्लंडचा संघ खूपच मजबूत आहे. जर आपण अफगाणिस्तान आणि इंग्लंडमधील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर, दोघांमध्ये आतापर्यंत फक्त तीन वनडे सामने खेळले गेले आहेत. इंग्लंडनं दोन सामने जिंकले आहेत तर अफगाणिस्ताननंही एक सामना जिंकला आहे. या फॉरमॅटमध्ये दोघांमधील शेवटचा सामना 2023 च्या वनडे विश्वचषकात झाला होता, जेव्हा इंग्लंडचा अफगाणिस्ताननं पराभव केला होता. आता 16 महिन्यांनंतर, दोन्ही संघ पुन्हा एकदा वनडे सामन्यात आमनेसामने येतील.

लाहोरचं हवामान कसं असेल : 25 फेब्रुवारी रोजी रावळपिंडी येथील ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळं वाया गेला. लाहोरमध्येही इंग्लंड-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असं म्हटलं जात आहे की आकाश ढगाळ राहील आणि हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं या सामन्यावर देखील पावसाचं सावट असणार आहे.

हेही वाचा :

  1. साहेबांना पराभूत करत अफगाण संघ दुसऱ्यांदा धक्का देणार? AFG vs ENG मॅच 'इथं' पाहा लाईव्ह
  2. AUS vs SA सामना पावसाला अर्पण; कोणाला होईल फायदा, कसं असेल समीकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.