VIDEO कोल्हापूर - एनडीआरडीएफच्या टीमकडून चिखलीसह आंबेवाडी गावात बचावकार्य सुरुच - kolhapur flood update news
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - कोल्हापूरात दुसऱ्या दिवशीसुद्धा चिखली आणि आंबेवाडी गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू राहिले. शनिवारी दिवसभरात जवळपास 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दोन दिवसांपासून येथील शिवाजी पुलावरून मदत कार्य सुरू आहे. अजूनही काही नागरिक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढले जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास 76 हजार नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. त्यातील 67 हजार नागरिक आपापल्या नातेवाईकांकडे गेले आहेत. तर जवळपास 10 हजार नागरिकांचे शहरातील विविध कॅम्पमध्ये स्थलांतर केले आहे.