Ratnagiri Flood: रत्नागिरीतील नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प - Vashishti river live update
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - मुसळधार पावसाचा फटका संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. चिपळूण, खेड, राजापूर शहरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी नागरिक पाण्यात अडकले आहेत. तसेच मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महामार्ग ठप्प झाला आहे. बावनदी, वाशिष्ठी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बावनदी पुलाच्या दोन्ही बाजूला जवळपास 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..