हैदराबाद Hottest Year 2024 : 2024 मध्ये हवामान बदलामुळं जगभरात तपमानात 41 दिवसांनी वाढ झालीय. यावर एक नवीन संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशनचे प्रमुख डॉ. फ्रेडरिक ओटो म्हणाले, की 2024 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होतं. या काळात 3 हजार 700 हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमावावे लागलेय.
"जगभरातील लाखो लोकांना उष्णतेमुळं आणि संबंधित आजारांमुळं विस्थापित व्हावं लागलं. हवामान बदलामुळं पूर, वादळ आणि दुष्काळामुळं लोकांना समस्यांना तोंड द्यावं लागलं". - डॉ. फ्रेडरिक ओटो, प्रमुख वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशन
2040 पर्यंत परिस्थिती गंभीर : यासोबतच ते म्हणाले की, जोपर्यंत जगात जीवाश्म इंधन जाळत राहील, तोपर्यंत हवामान बदलाची समस्या वाढत जाईल. संशोधनात असंही म्हटलं की जर दरवर्षी तापमान 2 अंश सेल्सिअसनं वाढत राहिलं तर 2040 पर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते.
काय आहे संशोधन अहवालात ? :
- 29 पैकी 26 नैसर्गिक आपत्ती हवामान बदलाशी संबंधित होत्या.
- काही ठिकाणी हवामान बदलामुळं उष्णतेची लाट 150 किंवा त्याहून अधिक दिवस होती.
- हवामान बदलामुळं होणारे नुकसान रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे.
- जगभरात सुमारे 13 महिन्यांपासून उष्णतेच्या लाटा सुरू आहेत.
- नैसर्गिक आपत्तींमुळं हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
सुदान, नायजेरिया आणि कॅमेरून या आफ्रिकन देशांमध्ये अति उष्णतेमुळं होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळं 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर कॅलिफोर्निया आणि डेथ व्हॅलीमध्येही अति उष्णतेनं कहर केला. अति उष्णतेमुळं दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
हवामान बदल रोखण्यासाठी जागरूकता : क्लायमेट सेंट्रलच्या क्लायमेट सायन्सच्या उपाध्यक्ष क्रिस्टीना डहल यांच्या मते, अशा घटनांचा परिणाम जगातील कमी लोकसंख्या असलेल्या आणि कमी विकसित देशांमध्ये जास्त आहे. हवामान बदलाची समस्या रोखण्यासाठी लोकांना जागरूक राहण्याची गरज आहे.
हवामान बदलामुळं जीवीतहानी : संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागानं याबाबत इशारा दिलाय. आपण कोणतीही कारवाई न केल्यास हवामान बदलामुळं होणाऱ्या घटनांची संख्या आणखी वाढू शकते, कारण जीवाश्म इंधन जाळल्यानं या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड वातावरणात मिसळला आहे, ज्यामुळं अनेकांचे मृत्यू झाले आहेत. याच वायूमुळं पृथ्वी खूप गरम झाली आहे.
हे वाचलंत का :