ETV Bharat / state

31 डिसेंबरची पार्टी नंतर... आधी प्रॉपर्टी टॅक्स भरा! मुंबई महापालिकेची करबुडव्यांना वॉर्निंग - BMC PROPERTY TAX

मुंबई महापालिकेनं प्रॉपर्टी टॅक्स भरुन घेण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत टॅक्स संकलनासाठी खिडकी खुली ठेवण्यात येणार आहे.

मुंबई  महापालिका
मुंबई महापालिका (संग्रहित फोटो)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2024, 6:22 PM IST

मुंबई : मुंबईत सर्वत्र सध्या 31 डिसेंबरच्या पार्ट्यांची जोरदार तयारी सुरू आहे. अनेकजण कुठे जायचं? कशी पार्टी करायची? याचं मित्रांसोबत प्लॅनिंग करत आहेत. तर, दुसरीकडे पालिका प्रशासन मात्र पुन्हा एकदा मालमत्ताकर वसुलीच्या कामात गुंतले आहेत. यासाठी पालिकेनं मुंबईकरांना लवकरात लवकर कर भरण्याचं आवाहन देखील केलं असून, जे मालमत्ता कराचे थकबाकीदार 31 डिसेंबर 2024 नंतर कर भरतील त्यांना दोन टक्के दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे सध्या प्रॉपर्टी टॅक्स थकबाकीदारांमध्ये 31 डिसेंबरची पार्टी नंतर, आधी प्रॉपर्टी टॅक्स अशी स्थिती निर्माण झाली आहे.

एका बाजूला 31 डिसेंबरच्या मध्यरात्री सर्वत्र जल्लोष, पार्टी, उत्साहाचं वातावरण असताना, दुसरीकडे पालिकेचे कर्मचारी मात्र आपल्या कार्यालयात रात्री बारा वाजेपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स स्वीकारण्यासाठी हजर राहणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पालिकेनं मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. या कालावधीत थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरला नाही, तर पालिका 1 जानेवारी 2025 पासून दंड वसूल करेल अशी तंबी प्रशासनानं दिली आहे. मालमत्ता थकबाकीदारांच्या एकूण थकीत रकमेवर पालिका प्रशासन 2% दंड आकारणार आहे. दुसरीकडे पालिकेनं देखील लोकांना मालमत्ता कर जमा करणं सोपं व्हावं यासाठी सर्व वॉर्ड कार्यालयं सोमवार, 30 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 10 आणि मंगळवार 31 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते मध्यरात्री 12 या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या माहितीनुसार, प्रशासनानं 2024-25 या आर्थिक वर्षात 6 हजार 200 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. परंतु आतापर्यंत केवळ 3 हजार 582 कोटी रुपयांचा मलमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. या कालावधीत थकबाकीदारांनी कर न भरल्यास 2 टक्के दंडात्मक रक्कम आकारली जाऊन कर वसुली केली जाणार असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं नकार दिला होता. एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 आणि ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 या सहा महिन्यांची देयकं मालमत्ताधारकांना एकाच वेळी पाठवण्यात आली आहेत.

जकात बंद झाल्यानंतर सध्या पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत मालमत्ता कर आहे. त्यामुळे सध्या नोटिसा मिळाल्यानंतरही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे. पालिकेच्या माहितीनुसार, विद्यमान आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2024 ते 24 डिसेंबर 2024 पर्यंत एकूण कर संकलन 5 हजार 243 कोटी 16 लाख रुपये इतकं करण्यात आलं आहे. 2023-24 या मागील आर्थिक वर्षातील मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ही 25 मे 2024 पर्यंत होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातील सुमारे 1 हजार 660 कोटी रुपये रक्कम देखील यात समाविष्ट आहे.

याचाच अर्थ 2024-25 या विद्यमान आर्थिक वर्षाचं कर संकलन हे 3 हजार 582 कोटी 67 लाख रुपये इतकं झालं आहे. विद्यमान आर्थिक वर्षाचं मालमत्ता कर संकलन उद्दिष्ट हे सुमारे 6 हजार 200 कोटी रुपये इतकं आहे. त्या तुलनेत आतापर्यंत 58 टक्के कर संकलन झालं आहे. अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसंच कायदेशीर कारवाई टाळावी असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.