VIDEO : अमरावतीमधील पूर्णा धरण ओव्हरफ्लो; 9 दरवाजे उघडले - पूर्णा धरण बातमी
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - अमरावती जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतातील कामे ठप्प झाली आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा धरण आता पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणाचे 9 दरवाजे आता 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यातून 61.62 घ.मी.से ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, नऊही दरवाजे उघडल्याने आता धरण परिसरात विहंगम दृश्य तयार झाले आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या संपूर्ण धरणाचे विहंगम दृश्य पाहूया ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून...