मेष (Aries) : तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला सुखद बातमी आणि अपेक्षित यश घेऊन येण्याची शक्यता आहे. आपणास नेमून देण्यात आलेली कामे पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्री आपणास वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळाल्यानं आपण उत्तम कामगिरी करू शकाल. पैसा विचारपूर्वक खर्च करणे आपल्या हिताचं होईल. अन्यथा आपले आर्थिक गणित कोलमडू शकते. आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणे करून आपल्याकडं पर्यायी व्यवस्था होऊ शकेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहणार असली तरी ऋतुजन्य विकारांचा त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. विशेषतः कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल आणि त्यामुळं घरात आनंदाचं वातावरण पसरेल. दांपत्य जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात आर्थिक नियोजन करण्याचा, प्रकृती उत्तम राहण्यासाठी उपाय करण्याचा आणि कुटुंबियांसह वेळ घालविण्यासाठी वेळ काढण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे.
वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्यतः उन्नतीदायक होण्याची संभावना आहे. आपल्या व्यवसायाशी संबंधित लोकांना गुंतवणुकीतून अचानकपणे पैसे मिळू शकतात. तसेच आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होऊ शकतो. असं असलं तरी कोणत्याही व्यवसायात किंवा योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ञ व्यक्तीचा किंवा हितचिंतकाचा सल्ला जरूर घ्यावा. आरोग्याकडं लक्ष द्यावं. आपला आहार आणि व्यायाम ह्यावर लक्ष द्यावं. जर प्रकृती विषयक काही समस्या असली तर वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज भासू शकते. विवाहेच्छुकांना विवाहासाठी हा आठवडा अनुकूल आहे. प्रेमसंबंध प्रगल्भ होऊ शकतात. वैवाहिक जोडीदारासह जवळचा किंवा दूरवरचा प्रवास संभवतो. आठवड्याच्या उत्तरार्धात परदेशात कारकीर्द किंवा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या लोकांना त्यात यश प्राप्त होईल. त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. ह्या आठवड्यात धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी सुद्धा मिळेल. समाजात प्रतिष्ठा उंचावेल. ह्या आठवड्यात नवीन कामात आपला वेळ आणि मेहनत करण्याचा यशस्वीपणे प्रयत्न करावा. प्रकृतीकडं लक्ष देण्यास सुद्धा सक्रिय राहावं.
मिथुन (Gemini) : हा आठवडा आपल्यासाठी आव्हानांचा आहे. कामातील जवाबदारी वाढल्यानं मानसिक तणाव होऊ शकतो. आपणास धीराने आणि संयमाने कामाचा निपटारा करावा लागेल. त्याचबरोबर ज्या व्यक्ती आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दूर राहावे. व्यावसायिकांना आठवड्याच्या उत्तरार्धात लाभ होईल. त्यांना अपेक्षित लाभ होईल. व्यापारानिमित्त केलेले प्रवास यशस्वी होतील. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. एकमेकांच्या सहवासात सुखद क्षण घालविल्यानं दोघेही आनंदित होतील. वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल. आर्थिक बाबतीत हळू हळू झाली तरी प्रगती नक्कीच होईल. आपणास आपल्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवावं लागेल. आपण जर आर्थिक नियोजन करून संयमित राहिलात तर यशस्वी व्हाल. प्रकृती सामान्य राहिली तरी आपणास त्याकडं लक्ष द्यावं लागेल. ह्या आठवड्यात धीरानं, संयमानं आणि सकारात्मक दृष्टीकोनानं आपण आपली कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. व्यावसायिक आणि प्रणयी जीवनातील उन्नतीसाठी वेळेचा सदुपयोग करा. तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या शरीराची काळीज घ्यावी. समस्यांचं निराकरण वेळेवर करावं.
कर्क (Cancer) : या आठवड्यात आपणास काही समस्यांचा विशेषतः कुटुंबाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जमीन-घर ह्यांच्याशी संबंधीत वाद सुद्धा आपल्या त्रासास कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळं आपणास धीर ठेवण्यास आणि भावनाशील होण्यापासून परावृत्त होण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती ह्या आठवड्यात थोडी विश्रांती घेऊ शकतात. प्रणयी जीवन दृढ करण्यासाठी आपणास प्रेमिकेची भावना आणि तिची मजबुरी समजून घ्यावी लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळं आपण काहीसे चिंतीत होऊ शकता. तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ऋतुजन्य विकार किंवा जुनाट आजार उफाळून येण्याची संभावना आहे. अशावेळी आहार, व्यायाम, विश्रांती ह्याकडं विशेष लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तंदुरुस्त राहिल्यानं शारीरिक, मानसिक समृद्धी मिळविण्यात आपणास मदत होईल.
सिंह (Leo) : हा आठवडा आपणास मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ फलदायी होणारा आहे. आपल्या प्रतिक्षेचे फळ आपणास ह्या आठवड्यात मिळेल. एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी होण्याचा मार्ग मिळेल. आपणास एखाद्या तज्ञ व्यक्तीची मदत मिळेल, जी आपली स्थगित असलेली कामे पूर्ण करण्यात सहाय्यक होईल. त्यामुळं आपणास मोठा दिलासा मिळेल. कार्यक्षेत्री आपली प्रशंसा होईल. वरिष्ठ आपल्यावर एखादी मोठी जवाबदारी सोपवू शकतात, जी आपल्या कारकिर्दीसाठी अत्यंत फायद्याची असेल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेशी आपला समन्वय उत्तम असेल. ह्या आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवासास जाण्याची संधी मिळेल जी आपल्या आत्मिक आणि मानसिक विकासासाठी महत्वपूर्ण होऊ शकेल. हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत यशदायी होणार आहे. हा आठवडा आपणास आपल्या कार्यक्षेत्री, प्रणयी जीवनात आणि आर्थिक स्थितीत प्रगतीचा अनुभव घेण्याची संधी देईल. ह्या सर्वांपासून अत्यंत सुखी आणि उत्साहित झाल्याची जाणीव आपणास होण्याची संभावना आहे. मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी सक्रिय व्हा. सर्व आव्हानांचा सामना करण्यास तयार राहा.
कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यात अत्यंत सकारात्मक बदलाची सुरूवात करू शकतो. दीर्घकाळापासून अपेक्षित ठिकाणी बदली होण्याची आपली मनोकामना पूर्ण होऊ शकते. त्यामुळं आपल्या जीवनास नवीन संधींचा सामना करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अप्रत्यक्षपणे एखादी विशिष्ट जवाबदारी मिळू शकते, जी त्यांची कारकीर्द उंचावण्यास मदतरूप होईल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्यानं धन वाढेल. परदेशाशी संबंधित कामे करणाऱ्यांना ह्या आठवड्यात अपेक्षित लाभ होईल, ज्यात आपल्या वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य असेल. ह्या आठवड्यात प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी उदभवण्याची संभावना असल्याने आपणास आहारावर आणि आपल्या दिनचर्येवर विशेष लक्ष द्यावं लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करण्यात अधिक परिश्रम करावे लागतील, जेणे करून त्यांना अपेक्षित यश प्राप्ती होऊ शकेल. संपूर्ण आठवड्यात आपल्या कामाचे लक्ष्यपूर्वक नियोजन करावे. जास्तीत जास्त वेळ श्रम आणि ज्या प्रवृतींमुळं आपला व्यक्तिगत विकास वाढण्यास मदत होऊ शकेल अशा प्रवृतींसाठी द्यावा.
तूळ (Libra) : हा आठवड्यात प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी उदभवण्याची संभावना असल्यानं प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ऋतुजन्य विकार होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. आपल्या आहारावर नियमितपणे लक्ष द्यावं. विद्यार्थ्यांना अध्ययनात मेहनत करावी लागेल. तसेच त्यांना कठोर परिश्रमांचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी धैर्याने आपली मेहनत निरंतरपणे चालूच ठेवावी. असं केल्यानेच आपणास अपेक्षित यश प्राप्त होईल. व्यावसायिकांना त्यांच्या कामात त्रासदायक परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. ह्या आठवड्यात कार्यक्षेत्री आपणास सहकार्य आणि समर्थनाची आवश्यकता जाणवेल. तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रणयी जीवनात आपणास घाई करून चालणार नाही. सामंजस्याने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करावा. आपला वैवाहिक जोडीदार आपला आधार बनू शकेल. ह्या दरम्यान आपणास त्यांच्याशी चर्चा करून समस्यांचं निराकरण करावं लागेल. हा आठवडा आपल्यासाठी वेळ काढूपणाचा आहे. परंतु याचवेळी आपणास प्रकृती आणि आर्थिक स्थितीवर लक्ष देण्याची गरज आहे. धैर्याने आणि सामंजस्याने काम करून आपल्या लक्ष्याच्या दिशेने प्रगती करावी.
वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा आपल्यासाठी विभिन्न अनुभव घेऊन येणारा आहे. आठवड्याच्या सुरूवातीस पैशासंबंधी एखादी समस्या उदभवू शकते, परंतु उत्तरार्धात अचानकपणे धन प्राप्ती झाल्यानं आपली ही समस्या सहजपणे दूर होईल. आपणास आपल्या कार्यक्षेत्री योजनाबद्ध काम करण्यास तयार राहावे लागेल, ज्यामुळं आपलाच फायदा होईल. आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर आपल्या क्षमतेनुसार त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करावा. प्रणयी जीवनात काही वाद होण्याची संभावना आहे. आपले दांपत्य जीवन सुखद होईल. आठवड्याच्या मध्यास कोर्ट-कचेरी किंवा शासनाशी संबंधित कामासाठी धावपळ होण्याची संभावना आहे, ज्याचं सामंजस्यानं निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या भेटीनं आपणास भविष्यात एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. ह्या संधीचा योग्य उपयोग करून आपल्या लक्ष्य प्राप्तीसाठी काम करावं. वेळेपूर्वी परिवर्तन आपल्या जीवनात नवीन स्थिती उभी करू शकेल, ज्यास आपणास सकारात्मक दृष्टीनं पाहावं लागेल. ह्या आठवड्यात समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपणास संवेदनशील होऊन काम करावं लागेल. आपले व्यावसायिक लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी नवीन संधीचा सामना करा.
धनु (Sagittarius) : हा आठवडा आपल्यासाठी आनंददायी आणि समृद्धीकारक आहे. आपण आपली दैनंदिन कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. प्रलंबित कामे सुद्धा त्वरित पूर्ण होतील. सुरूवातीलाच मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळाल्यानं आपण खुश व्हाल. कारकीर्द, व्यावसायिक किंवा व्यक्तिगत कार्यासाठी जवळच्या किंवा दूरवरच्या प्रवासाचे आयोजन संभवते. ज्यामुळं खर्चात वाढ होऊ शकते. ह्या दरम्यान मित्र आणि हितचिंतकांच्या मदतीनं आपले अंदाजपत्रक संतुलित ठेवू शकाल. तसेच सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. प्रेमात पडू इच्छिणाऱ्यांच्या जीवनात एखाद्या विशेष व्यक्तीचे आगमन होण्याची संभावना आहे. जे प्रणयी जीवन जगत आहेत त्यांचे जीवन मधुर आणि सुखद होईल. वैवाहिक जीवन आनंदानं आणि समृद्धीने भरलेले राहील. एकंदरीत हा आठवडा आपल्यासाठी उत्तम फलदायी आणि समृद्धीकारक होईल. ज्यामुळं आपणास सुख, समृद्धी आणि प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची संधी मिळेल.
मकर (Capricorn) : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. आपणास काही सकारात्मक वृद्धीच्या आणि समृद्धीच्या संधी मिळतील. आठवड्याच्या सुरूवातीस रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना यश प्राप्त होईल. तसेच एखाद्या मित्राच्या मदतीनं कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होऊ शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठांची कृपा आणि कनिष्ठांचे सहकार्य सुद्धा मिळेल. ह्या आठवड्यात पूर्वी केलेल्या आर्थिक गुतंवणूकीतून लाभ होऊ शकतो. जमीन-घर ह्यांच्याशी संबंधित वादात आपल्या बाजूनं निकाल लागू शकतो. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा सकारात्मक आहे. आपणास आपल्या प्रेमिकेशी संवाद साधून शंकेचे समाधान करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पती-पत्नी दरम्यान भावनात्मक जवळीक वाढल्यानं आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी आपणास मिळेल. एखादी तीर्थयात्रा सुद्धा संभवते. ह्या आठवड्यात आपणास आत्मनिरीक्षण आणि एकांतात वेळ घालविण्याची संधी मिळेल, जी आपल्या सामाजिक, धार्मिक वृद्धीस मदत होण्यास मदत होईल.
कुंभ (Aquarius) : या आठवड्यात आपणास काही महत्वाच्या आव्हानांचा सामना करावा लागण्याची संभावना असल्यानं आपणास सतर्क राहावं लागेल. आळस आणि अभिमान याचा त्याग करणे आपल्यासाठी महत्वाचं आहे. वेळेवर काम करण्याची संवय लावण्याचा आपणास प्रयत्न करावा लागेल. संबंधात सुद्धा वेळेवर सामंजस्य दाखवून संवाद साधावा लागेल. व्यावसायिक सहकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी सुद्धा वेळ काढून भागीदारी मजबूत करावी. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्याचा प्रयत्न करावा. आपले आरोग्य आणि संबंध सुखद करण्यावर लक्ष केंद्रित करावे. वयस्कर व्यक्तींच्या सल्ल्याचं महत्व समजून घ्यावं. त्यांच्याशी सामंजस्याने संवाद साधावा. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानकपणे आपल्यावर एखादी जवाबदारी येऊ शकते, जी पार पाडण्यासाठी आपणास जास्त प्रयत्न करण्याची गरज भासेल. ह्या दरम्यान आपणास धैर्याने आणि समर्पणाने आपल्या कामांचा सामना करावा लागेल. परीक्षा-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या अखेरीस एखादी खुशखबर मिळू शकते. आपल्या मेहनतीचे, प्रयत्नांचे यथोचित फळ आपणास मिळू शकते. तेव्हा आपली तयारी निरंतर चालूच ठेवून मेहनत करत राहावे.
मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी यशदायी होऊ शकतो. परंतु वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम आणि धावपळ करावी लागेल. आपणास आपल्या वेळेचे योग्य नियोजन करावं लागेल, जेणेकरून आपण आपले लक्ष्य प्राप्त करू शकाल. पदोन्नतीची वेळ सुद्धा आपणास अनुकूल होऊ शकते. आपण जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात आपणास एखादी संधी मिळू शकते. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. आपल्या प्रेमिकेकडून भेटवस्तू मिळाल्यानं आपलं मन प्रसन्न होईल. प्रकृती सामान्य राहिली तरी एखादी लहान समस्या मोठे स्वरूप धारण करणार नाही ह्याची काळजी आपणास घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत सुद्धा हा आठवडा आपल्यासाठी सामान्याहून अधिक लाभदायी होऊ शकतो. घर-जमीन ह्यांच्या खरेदी-विक्रीत घाई करू नये. तसे करण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्यावा. त्यामुळं सामंजस्याने काम करण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.
हेही वाचा -
यंदा मकर संक्रांत कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व