अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येत ३० जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळं लोकांच्या मनात दिल्लीतील निर्भया घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. पीडित मुलीचा मृतदेह १ फेब्रुवारीला सापडला. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी अयोध्येतील सपा खासदार अवधेश प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना त्यांना रडू कोसळलं. ते म्हणाले की, "पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही तर, मी राजीनामा देईन".
एक संशयित पोलिसांच्या ताब्यात : या घटनेची माहिती देताना एसएसपी राज करण नय्यर म्हणाले की, "30 जानेवारीच्या रात्री बहिणीसोबत झोपलेली मुलगी बेपत्ता झाली. या घटनेची माहिती मिळताच गुन्हा दाखल करत, मुलीच्या शोधासाठी दोन पथकं तयार करण्यात आली. शनिवारी सकाळी एका शेताजवळ मुलीचा मृतदेह आढळला. यानंतर, फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले. यावरून असं दिसून आलं की, मुलीची हत्या एका ठिकाणी केली आणि तिचा मृतदेह दुसऱया ठिकाणी टाकण्यात आला. या घटनेचा तपास करण्यासाठी तीन पथकं तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. लवकरच ही घटना उघडकीस येईल आणि आरोपींना जलदगतीनं शिक्षा होईल".
...तर, मी राजीनामा देईन : समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांचे नाव जागतिक विक्रमात नोंदवू इच्छितात. ते अनेक वेळा अयोध्येला गेले आहेत. अयोध्येतील मिल्कीपूर निवडणुकीत भाजपाला अशांतता निर्माण करायची आहे. परंतु, जनतेनं निवडणूक हाती घेतली आहे." पुढे ते म्हणाले की, "या प्रकरणी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेऊन पीडितेला न्याय मिळवून देऊ. जर पीडित मुलीला न्याय मिळाला नाही तर, मी राजीनामा देईन."
हेही वाचा :