Omicron Virus in Pune : महापालिकेने सर्व खबरदारी घेतली आहे.. नागरिकांनी घाबरून जाऊ नये - महापौर - ओमायक्रॉन व्हेरिएंट पुणे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे शहरामध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. महानगरपालिकेने सर्व खबरदारी घेतली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. परदेशातून परतलेल्या २६७ नागरिकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या असल्या तरी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. पुणे शहरात ४३८ नागरिक परदेशातून नुकतेच परतले असून त्यापैकी ३७० नागरिक मनपा हद्दीतील आहेत. ३७० पैकी ३३५ नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. आतापर्यंत २६७ नागरिकांची आरटीपीसीआर RT-PCR करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पुणे महानगरपालिकेने सर्व खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.