सचिन वाझे प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधकांध्ये जुंपली - नाना पटोले
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11055577-thumbnail-3x2-aa.jpg)
मुंबई - अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस दलात खांदेपालट झाली. त्यावरून राज्यातील राजकारण तापू लागले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये या प्रकरणावरून टीका टिप्पण्या होऊ लागल्या आहेत. यात मुंबई पोलीस दलात जे बदल झाले ते भाजपाच्या दबावामुळे झाले नाहीत, तसेच भाजप महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. तर विरोधकांकडूनही या प्रकरणात थेट सरकारचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री वाझे प्रमाणे परबिरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.