PM Paid Homage to Bipin Rawat : पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रध्दांजली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा बुधवारी तामिळनाडूत अपघात ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाला. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. बिपीन रावत आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या अकाली निधनाने सर्वांचे डोळे पाणावले. आज सांयकाळी जनरल बिपीन रावत(CDS General Bipin Rawat), त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचे पार्थीव शरीर पालम विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर जनरल बिपीन रावत यांच्या पार्थीव शरीराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील विमानतळावर येऊन रावत यांच्या पार्थीव शरीराला श्रद्धांजली (PM Paid Homage to Bipin Rawat) वाहिली.
Last Updated : Dec 9, 2021, 10:43 PM IST