दुरुस्तीसाठी वीजेच्या खांबावर चढला..अन् क्षणात खाली कोसळला..पाहा व्हिडिओ.. - विजेचा धक्का न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11457524-thumbnail-3x2-viz.jpg)
औरंगाबाद - कमळापूर रोडवर क्लस्टर अंतर्गत ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या ड्रेनेजलाईनच्या कामासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणचे झिरो वायरमन गणपत पट्टेकर हे वीज प्रवाह बंद करण्यासाठी विद्युत खांबावर चढले होते. विद्युत खांबावर काम करीत असतांना अचानक विजेचा शॉक लागल्याने गणपत पट्टेकर हे खांबावरुन जमीनीवर खाली पडले. हा सर्व प्रकार एकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा प्रकार पाहताच लगत भाजीपाला विक्री करत असलेल्या महिलांनी आरडा-ओरडा केला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी गणपत पट्टेकर यांना पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी सिडको वाळूजमहानगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात गणपत पट्टेकर यांच्या डाव्या डोळयाजवळ दुखापत झाली असून कमेरत फॅक्चर झाले आहे.
Last Updated : Apr 19, 2021, 3:28 PM IST