VIDEO : खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणांचा कुटुंबासह योगा - yoga day celebration amravati
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - देशासह संपूर्ण जगात रविवारी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्या कुटुंबासह सामाजिक अंतर ठेऊन मोकळ्या मैदानात योगा, प्राणायाम केला. यावेळी स्वतःला फिट व निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाला दरोरोज काही मिनिटे योग, प्राणायाम, व्यायाम करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. कोरोनाच्या काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चांगल्या आहारासोबत वृद्धांपासुन ते लहान मुलापर्यंत पर्यत सगळ्यांनी दररोज 30 मिनिट योगा केला पाहिजे, असे आवाहनही खासदार राणा यांनी यावेळी केले.