आमदार पतीने दिला खासदार पत्नीला झोका...पाहा व्हिडिओ - MLA ravi rana
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे सध्या चार दिवसांच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मेळघाटातील अनेक गावांना भेटी दिल्या. तसेच आढावा बैठक आणि विकास कामांचे भूमीपूजन करत आहे. अशातच चिखलदरा येथील वनविभागाच्या बागेतील ओपन जिमचा शुभारंभ खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राणा दाम्पत्याने ओपन जिमवर व्यायाम करत व्यायामाचे महत्व उपस्थितांना करून दिले. जीमनंतर झोका खेळण्याचा मोह खासदार नवनीत राणांना आवरता आला नाही. त्यामुळे आमदारांनी खासादारांना झोका दिला.
Last Updated : Oct 8, 2020, 4:47 PM IST