Mokshada Ekadashi Special : विठ्ठल रुक्माई मंदिरात नयनरम्य फुलांची आरास, ऊबदार पोशाख विठुरायाला परिधान - Vitthal rukmini temple Video

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 14, 2021, 12:03 PM IST

पंढरपूर - विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज मोक्षदा एकादशी निमित्त ( Mokshada Ekadashi Special ) विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक नयनरम्य अशी फुलाची आरास ( Vitthal Rukmini temple adorned ) करण्यात आली आहे. सहाशे किलो फुलांचा वापर करण्यात आला. महाराष्ट्रात सर्वत्र गुलाबी थंडी पसरली आहे. वातावरणात गारवा जाणवायला लागलाय. विठुरायाला सुद्धा थंडीपासून बचाव करण्यासाठी विशेष पोशाख केला जातोय. ऊबदार पोशाख विठुरायाला परिधान करायला सुरुवात केली जाते. या पोशाखात प्रामुख्याने मुंडासे, रजई आणि मफलरचा समावेश असतो. रात्रीची आरती आटोपल्यानंतर विठुरायाच्या झोपायच्या वेळेआधी संपूर्ण शरीर पुसले जाते. डोक्यावर असलेला मुकुट काढून त्याजागी ऊबदार मुंडासे बांधला जाते. थंड वारा कानाला लागू नये यासाठी मफलर बांधला जातो. अंगावर रजई टाकली जाते. प्रक्षालपुजेच्या दुसऱ्या दिवसापासून केली जाते. तर हिवाळा संपेपर्यंत हा पोशाख दररोज केला जातो.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.