ETV Bharat / state

मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा शिवसेना उबाठाची तयारी; नाना पटोले म्हणाले मग संजय राऊतांना कोणी अडवलं ? - BMC ELECTION

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचं सूतोवाच संजय राऊत यांनी केलं आहे. त्यावरुन महाविकास आघाडीत मोठा वाद रंगण्याची शक्यता आहे.

BMC Election
BMC Election (BMC Election)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

मुंबई : मुंबई महापालिका देशातील सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून गणली जाते. मुंबई महापालिकेवर गेली अडीच दशकं शिवसेनेची (एकसंध) एकहाती सत्ता राहिली आहे. मागील 30 वर्षाच्या कालावधीत केवळ दोन वेळचा अपवाद सोडला, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर एकछत्री अंमल कायम ठेवला आहे. या अगोदरच्या महापालिका निवडणुकीत भाजपानं शिवसेनेची ही अनभिषिक्त मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. आपला महापौर कायम ठेवण्यात शिवसेनेनं यश मिळवलं. अखेर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन वेगळा गट नव्हे तर पक्षाचं नाव, निवडणूक कायदेशीर पद्धतीने मिळवल्यानंतर मात्र महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी बदलली आहे. आता शिवसेना (उबाठा) पक्षाला महापालिकेतील सत्ता टिकवणं वाटतं तितकं सोपं राहिलं नाही. या परिस्थितीत, आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना (उबाठा) स्वबळावर लढेल, असं वक्तव्य शिवसेनेचे (उबाठा) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मेंदूतील गोष्टी संजय राऊत यांच्या तोंडून बाहेर पडतात, असं राजकीय वर्तुळात म्हटलं जातं. अर्थात या मुद्यावर थोडी सावध भूमिका घेत राऊत यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना (उबाठा) ने स्वबळावर लढावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची सारवासारव केली आहे. मात्र संजय राऊतांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई महापालिका उबाठा लढवणार स्वबळावर : याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की,"मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्वबळावर लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. म्हणून आम्ही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर तर इतर महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. मुंबई महापालिकेत शिवसेना हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे काहीही करुन आम्हाला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची आहे. नाहीतर मुंबई वेगळी होईल. सध्या मुंबईत मराठी माणसांवर हल्ले सुरू आहेत. ते पाहिलं तर आम्हाला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवणं गरजेचं आहे." थोडक्यात महाविकास आघाडीतला घटक पक्ष असूनही मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्याबाबतची पक्षाची भूमिका परस्पर जाहीर करून टाकली. दरम्यान, शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा मैदानात उतरत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका सुरु करत स्वबळावर लढण्याचे मनसुबे स्पष्ट केले आहेत.

आम्ही अजूनही महाविकास आघाडीत : महाविकास आघाडीत असतानाही उबाठा मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा विचार करत आहे, यावर संजय राऊत यांना विचारलं. यावेळी ते म्हणाले, की "आम्ही अजूनही महाविकास आघाडी सोबतच आहोत. आम्ही महायुतीत भाजपासोबत असताना देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणूक तसंच जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवाव्यात अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. विधानसभेत काही जागा स्वबळावर लढवाव्यात असं आम्हाला वाटत होतं. त्यातीलच पुणे जिल्ह्यातील खेडमधील जागा देखील आम्ही शेवटच्या टप्प्यात आमच्याकडं घेतली. ती जागा आम्ही जिंकली, जुन्नरची जागा देखील आम्ही लढलो असतो तर जिंकलो असतो. मात्र निवडणुकीत जेव्हा आघाडी असते तेव्हा अशा गोष्टी घडत असतात," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संजय राऊतांना कोणी अडवलं ? - नाना पटोले : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात रंगलेला कलगी-तुरा चर्चेचा विषय ठरला होता. राऊत यांनी केलेल्या विधानानंतर नाना पटोले यांनीदेखील काँग्रेसच्या वतीने पलटवार केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत नाना पटोले यांनी "संजय राऊत यांना कोणी थांबवलं?" असा प्रतिप्रश्न विचारत एका वाक्यात हा विषय संपवण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधला विसंवाद विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिसला होता. त्याची किंमतही महाविकास आघाडीला चुकवावी लागली होती. आता पुन्हा राऊत - पटोले यांच्यातील वादाच्या निमित्ताने महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.