ETV Bharat / politics

बीडचं प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी निगडीत असल्यानं दाबलं जाणार का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल - BALASAHEB THORAT ON MAHAYUTI

केंदीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (21 डिसेंबर) बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात निषेध रॅली पार पडली.

BALASAHEB THORAT ON MAHAYUTI
बाळासाहेव थोरात (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. माजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळं राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. बीडमधील सरपंच हत्या प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी निगडीत असल्यानं हे प्रकारण दाबलं जाणार का? असा सवाल बाळासाहेब थोरात उपस्थित केला आहे.

जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : केंदीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (21 डिसेंबर) बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात निषेध रॅली पार पडली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून देशात मोठं वादळ उठल्यानं याची दिशा बदलण्यासाठी भाजपानं मुंबईतील काँग्रेसचं कार्यालय फोडलं. त्याचबरोबर संसदेच्या प्रवेशद्वारावर धुडगूस घातला, जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपानं हे कृत्य केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला अपमान जनता कधीच विसरणार नाही."

प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेव थोरात (Source - ETV Bharat Reporter)

राष्ट्रपुरुष केवळ सत्ता मिळवण्यासाठी असा भाजपाचा समज : "देशात आणि राज्यात घडणाऱ्या घटना काळजी वाढवणाऱ्या आहेत. सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रपुरुषांची अवहेलना केली जात आहे. परभणीच्या आंदोलनात एका गरीबाचा जीव जातो, तर बीडमध्ये सरपंचाचीच हत्या होते. देशाच्या सर्वोच्च सभागृहात गृहमंत्र्यांकडून राष्ट्रपुरुषांची अवहेलना केली जाते. राष्ट्रपुरुष केवळ सत्ता मिळवण्यासाठी, असा भाजपाचा समज आहे. जे नागरिक जागरुक आहेत, त्यांनी याचा निषेध केला पाहिजे. सरकारला धारेवर धरलं पाहिजे," असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केलं आहे. बीडमधील सरपंच हत्या प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी निगडीत असल्यानं हे प्रकारण दाबलं जाणार का? असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.

सर्व पक्षांनी एकत्र येवून निषेध व्यक्त करावा : "लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये जाण्यास रोखलं गेलं, धक्काबुकी करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांना देखील धक्काबुकी करण्यात आली. या दुर्दैवी घटनेचा सर्व पक्षांनी एकत्र येवून निषेध व्यक्त केला पाहिजे," असंही बाळासाहेब थोरात यावेळी बोलताना म्हणाले.

सरकार पाच वर्ष एकत्र काम करेल असं वाटत नाही : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीसाठी 12 दिवसांचा अवधी लागला. तर 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. मात्र, खातेवाटप अद्यापही झालेलं नाही, यावरून बाळासाहेब थोरातांनी सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला. "महायुती सरकारमध्ये बराच गोंधळ आहे. हे सरकार पुढील पाच वर्ष एकत्र काम करेल, असं वाटत नाही. कारण त्यांच्यातील मतभेद आताच चव्हाट्यावर आले आहेत," असं म्हणत त्यांनी महायुती सरकारला टोला लगावला.

हेही वाचा

  1. मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा शिवसेना उबाठाची तयारी; नाना पटोले म्हणाले मग संजय राऊतांना कोणी अडवलं ?
  2. भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग ? : देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर संजय राऊत यांचा हल्लाबोल
  3. मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा? संजय राऊतांनी दिले स्पष्ट संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.