नाशिकच्या ग्रामदैवत कालिका माता मंदिराचे भाविकांना ऑनलाइन दर्शन - KALIKA MATA
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9206991-433-9206991-1602918957191.jpg)
नाशिकची ग्रामदैवत कालिका देवीच्या मंदिरात आज सकाळी घटनस्थापनेनिमित्त विशेष पूजा पार पडली. कोरोनामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश नसल्याने मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आजची विशेष पूजा करण्यात आली. यावर्षी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सवात होणारी कालिका देवी मातेची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कालिका देवी मातेचे दर्शन भाविकांना ऑनलाइन उपलब्ध व्हावे, यासाठी सोय करण्यात आली.