पोलिसांची भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल - जालना भाजप पदाधिकारी मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
जालना - जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे. हा तरुण भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची माहिती आहे.