सुप्रीम कोर्टाला मुंबईतील स्थिती माहिती आहे का? - संदीप देशपांडे - Corona Latest
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11716191-5-11716191-1620711373673.jpg)
मुंबई - 'महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने व निती आयोगाने मुंबई मॉडेलचे कौतुक केले आहे. जेव्हा रुग्ण संख्या कमी होते, त्यावेळेस मुंबई मॉडेल किंवा इतर मॉडेल पुढे येतात. तर जेव्हा रुग्ण संख्या वाढते, तेव्हा मुंबईकरांना बेजबाबदार ठरवले जाते. सुप्रीम कोर्टाने केलेले कौतुक पाहून प्रश्न पडतो की, सुप्रीम कोर्ट आणि नीती आयोग डोक्यावर पडले आहे का? सुप्रीम कोर्टाला मुंबईतील प्रत्यक्ष परिस्थिती माहित आहे का?' असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.