रस्त्याच्या मागणीसाठी माजी सरपंचाने केला आत्मदहनाचा प्रयत्न - Former Sarpanch in jalna
🎬 Watch Now: Feature Video

जालना - बदनापूर तालुक्यातील जवसगाव ते हालदोला या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी एकाने अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. जालना पंचायत समिती कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. दत्ता वैद्य असे आत्मदहणाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने येथील अनर्थ टळला आहे. आज जालना पंचायत समिती कार्यालयासमोर बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथील गावकऱ्यांनी पंचायत समितीसमोर रस्त्यासाठी आंदोलनाचा ईशारा दिला होता. यावेळी ही घटना घडली. पोलिसांनी आत्मदहणाचा प्रयत्न करणाऱ्याला ताब्यात घेतल्यानं पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. या रस्त्याच्या कामासाठी किमान लेखी आश्वासन द्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यानंतर त्यांना लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.