मीरा भाईंदर : युवकाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप - family members blame hospital for negligence after youth's death in mira bhayander
🎬 Watch Now: Feature Video
मीरा भाईंदर : मिरा रोडच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. राघवेंद्र मिश्रा असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना 40 हजारांचे किंवा पाच हजारांचे इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगितल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. यानंतर न विचारताच रुग्णालयातील डॉक्टरांनी पाच हजारांचे इंजेक्शन दिल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबियांनी शवविच्छेदन केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत रुग्णालय व्यवस्थापन व डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबातील सदस्यांनी यांनंतर घेतला.