खालापूर तालुक्यात 103 गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण - खालापूर तालुका
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13468421-647-13468421-1635296936653.jpg)
रायगड - खालापूर तालुक्यातील 103 गावांचे ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षण सर्वेचे कामकाज अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या साह्याने करण्यात येत आहे. या कामासाठी प्रत्येक गावात चुना मार्किंगचे काम सुरू आहे. 25 आँक्टोबर रोजी मा. उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबई मिलिंद चव्हाण यांनी ड्रोन कामाचा शुभारंभ केला. तसेच रायगड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी ड्रोन कामाचे मार्गदर्शन व नियोजन केले. तसेच खालापूर तालुक्यातील 103 गावांचा ड्रोनद्वारे होत असलेल्या गावठाण सर्वेक्षण कामकाजात जनतेने सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी व उपअधीक्षक भूमी अभिलेख शरद काळे यांनी केले आहे.