पुण्यात लॉकडाऊन टळला मात्र, निर्बंधांची होणार कडक अंमलबजावणी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे- पुणे शहरात आणि जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आता शनिवार 3 एप्रिलपासून पुढील 7 दिवस संपूर्ण जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणेकरांची लॉकडाऊनपासून सध्या सुटका झाली असली तरी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांची कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी 2 एप्रिलला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेतली.