कोल्हापुरात दररोज दीड ते दोन हजार रेमडेसिवीरची होतेय मागणी - कोल्हापूर कोरोना बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11460202-486-11460202-1618829877222.jpg)
कोल्हापूर - कोल्हापुरात मागील तीन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मात्र, पुरवठा कमी असल्याने नियंत्रण कक्षाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. दररोज पंधराशे ते दोन हजार इंजेक्शनची मागणी होत असून त्या तुलनेत पुरवठा करण्याचे प्रयत्न आता नियंत्रण कक्षाला करावे लागत आहेत. दररोज अनेक रुग्णालयातून इंजेक्शनसाठी मागणी होत आहे. मात्र, इंजेक्शनच्या उपलब्धतेनुसार इंजेक्शन दिले जात आहेत. शिवाय रुग्णालयांनी कोणत्याही प्रकारे नातेवाईकांना इंजेक्शनबाबत मागणी करून घरबाटीचे वातावरण निर्माण करू नये. त्यांनी थेट नियंत्रण कक्षाकडे रीतसर मागणी करावी इंजेक्शनच्या उपलब्धतेनुसार ते आपल्याला पुरवण्यात येईल, असे नियंत्रण कक्ष प्रमुख सपना कुपेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे. भविष्यात आणखी इंजेक्शनची मागणी वाढेल असेही त्यांनी म्हटले आहे.