जळगावात कोरोना लसीकरणाला सुरुवात - जळगाव कोरोना लसीकरण न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेच्यावतीने पूर्वतयारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील सुमारे 20 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यासाठी आवश्यक डेटा बेस देखील तयार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदींच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सात ठिकाणी हे लसीकरण होत आहे.