नफा नको, किमान गुंतवणूक तरी मिळू द्या; महिला बचत गटाची व्यथा - शिरुर विशेष बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9421640-thumbnail-3x2-pune.jpg)
शिरुर (पुणे) - दिवाळी म्हटले की, दिव्यांचा सण! या दिवाळीत नागरिक आपल्या घरात, अंगणात दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई करून परिसर प्रकाशमय करतात. पण, हेच दिवे बनवणाऱ्या बचत गटातील महिलांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. सात महिन्यांपासून कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत मेहनत करून बनवलेल्या वस्तू विक्रीविना पडून असल्याने नफा नको, मात्र किमान गुंतवलेले भांडवल मिळू द्या, अशी म्हणण्याची वेळ आता या महिलांवर आली आहे.