Chandrakant Patil माझी खुर्ची देतो तुम्हाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भाजप पदाधिकाऱ्याला ऑफर पाहा VIDEO - BJP leader offer to party worker
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14415320-664-14415320-1644396390910.jpg)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील BJP Leader Chandrakant Patil यांनी पुणे महानगर पालिकेत समावेश झालेल्या वाघोलीमध्ये काल मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव व हवेली तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी पाटील यांच्या हस्ते सातव यांनी राबवलेल्या सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थींना कार्ड वाटप करण्यात आले. तर संदीप सातव यांनी केलेल्या विकास कामांचा कार्य अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव यांना मंचावर बसण्यासाठी खुर्ची नव्हती. तेव्हा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यांना स्वतःच्या खुर्चीवर बसायची ऑफर chandrakant patil offer to bjp worker दिली. मात्र उपसरपंच संदीप सातव यांनी त्याला नाकार दिला. यावरुन खुर्चीच्या ऑफरची चर्चा सर्वत्र रंगली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST