BJP Yuvati Morcha Agitation : भाजप युवती मोर्चाचे उदय सामंत यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन - विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14205525-437-14205525-1642388243537.jpg)
मुंबई - विद्यार्थ्यांच्या भविष्याचे वाटोळे करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) आहे. हे सरकारने (BJP Yuvati Morcha Agitation Uday Samant residence) त्वरित मागे घ्यावे, अन्यथा तिव्र आंदोलन करू असे आव्हान देत उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मुंबई येथील शासकीय निवास स्थानासमोर (BJP Yuvati Morcha Agitation) भाजपा युवा मोर्चा युवती विभागाने रागोळी काढून निषेध आंदोलन केले आहे. आज भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मंत्रांच्या घराबाहेर निषेध रांगोळ्या काढून हे काळे विधेयक मागे घेण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. (Uday Samant residence) त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दीक चकमकी झालेल्या पाहायला मिळाल्या.