भाजप हवेत तीर मारणारा पक्ष, राष्ट्रवादीच ग्रामपंचायतीत मोठा पक्ष - नवाब मलिक - राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत भाजपने केलेले दावे पोकळ असून राष्ट्रवादीच मोठा पक्ष ठरला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत 'ईटीव्ही भारत'सोबत विशेष बातचीत करताना त्यांनी हा दावा केला. निवडणुकीचे निकाल येण्या आधीच भाजपकडून सहा हजार जागा जिंकणार असल्याच्या वल्गना करण्यात आल्या होत्या. मात्र, यात काहीही तथ्य नाही. भाजप केवळ हवेत तीर मारणारा हा पक्ष असल्याची टीका मलिक यांनी केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेनेही सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, मलिक म्हणाले की, या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर झालेल्या नाहीत. आमचे अनेक गटही एकमेकांच्या विराधात लढले आहेत. त्यामुळे पुढे सरपंच निवडीच्या वेळेस ते एकत्र येण्याचीही शक्यता आल्याचे त्यांनी सांगितले.
Last Updated : Jan 19, 2021, 8:49 PM IST