अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांचे 'भीक मांगो आंदोलन'; राष्ट्रवादीच्या आमदारांनाच मागितली भीक - राष्ट्रवादीच्या आमदारांनाच मागितली भीक
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14289995-572-14289995-1643202000754.jpg)
अकोला - एसटी कर्मचारी गेल्या 90 दिवसांपासून संपात सहभागी आहे. गेल्या 90 दिवसांपासून त्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी भीक मांगो आंदोलन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरले आहे. दरम्यान आगार क्रमांक 1 येथे एसटी कर्मचाऱ्यांनी टावर चौक तसेच फतेह चौकामध्ये भीक मांगो आंदोलन केले. यावेळी तिथे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनाही कर्मचाऱ्यांनी भीक मागितली. आमदार मिटकरी यांनी कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते. कर्मचाऱ्यांरी त्यांचे पाया ही पडले. या प्रकारानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना स्थानबद्ध करून थोड्यावेळाने सोडून दिले.