महाशिवरात्रीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात शेवंतीच्या फुलांची सुंदर आरास - पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजावट व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर - पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून महाशिवरात्रीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात शेवंतीच्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. या सजावटीसाठी पंढरपूर येथील विठ्ठल भक्त आनंत नंदकुमार कटप यांनी देणगी दिली. माघ कृष्ण त्रयोदशीनिमित्त विठ्ठल व रुक्मिणी मातेला पांढरा शुभ्र पोशाख, पांडुरंगाच्या डोक्यावर सोनेरी टोप, रुक्मिणी मातेच्या अंगावर अलंकार असा पोशाख करण्यात आला. शेवंती व बेलपत्रांची आकर्षक सजावट करून त्यात बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिमा साकारण्यात आली. यासाठी एक हजार टन फुलांचा वापर करण्यात आला. मंदिरा मुखदर्शन सुरू आहे.