NARAYAN RANE ARREST: सुरुवात राज्य सरकारने केली, शेवट आम्ही करू- आमदार आशिष शेलारांचा इशारा - BJP MLA Ashish Shelar latest news

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 24, 2021, 4:54 PM IST

मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली. या अटकेचा आम्ही निषेध करतो. सुरुवात राज्य सरकारने केली, शेवट आम्ही करू, आमदार आशिष शेलार यांनी गर्भित इशारा दिला आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानीही शरमेने आत्महत्या करतील, अशी राज्य सरकार झुंडशाही करत आहे. पक्षाची भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केली होती, तरी राज्य सरकारने झुंडशाही माजवत अटक केली आहे. शिवसेनेने कार्यालयावर हल्ले बंद करावेत. नाहीतर राज्यभर भारतीय जनता पक्षात तांडव करेल. भारतीय जनता पक्षाकडे सीडी आहेत. त्या सीडी बाहेर काढल्या तर महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष एकमेकांवर तक्रारी दाखल करतील, असाही त्यांनी दावा केला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.