Nagar Panchayat Election 2021 : सकाळ-सकाळ मतदान केंद्रावर शुकशुकाट, मात्र ९५ वर्षाच्या आजी कडाक्याच्या थंडीत हजर - Nagar Panchayat Election 2021
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली नगरपंचायतीच्या 30 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतु, सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. सकाळी सकाळी लोक बाहे पडायला तयार नाहीत. (Nagar Panchayat Election 2021) त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांचा काही प्रमाणात उत्साह कमी आहे. मात्र, 95 वर्षांच्या आजीने थंडीला काही जुमानल नाही. तिवसा शहरातील पार्वतीबाई शेंद्रे या आजीचे नाव. त्यांनी मतदान करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत सकाळी-सकाळी मतदानकेंद्र गाठलं. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी संवाद साधलाय. आजीनेही जोरदार संवाद साधलाय.