दुबई ICC Champions Trophy Streamed in Nine Languages : सर्व क्रिकेटप्रेमी ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सुरुवातीची आतुरतेनं वाट पाहत आहेत. मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा यावेळी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवली जात आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. परंतु, भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळेल.
All the details on how you can watch the #ChampionsTrophy 2025 across the globe 📺 👀https://t.co/0mCzdMw90n
— ICC (@ICC) February 15, 2025
आठ संघ होणार सहभागी : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल, तर अंतिम सामना 9 मार्च रोजी होईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या 8 संघांना प्रत्येकी 4 संघांच्या दोन वेगवेगळ्या गटात विभागण्यात आलं आहे. दरम्यान, आयसीसीनं बक्षीस रकमेची घोषणा करतानाच, या सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचीही सर्व माहिती शेअर करुन भारतीय चाहत्यांना एक मोठी भेट दिली.
CHAMPIONS TROPHY WILL BE STREAMED ACROSS 16 FEEDS ON JIOHOTSTAR 🤯 pic.twitter.com/6BSlAkTlwO
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2025
पहिल्यांदाच, 9 वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट सामने प्रसारित होणार : ICC नं जाहीर केलेल्या लाईव्ह टेलीकास्टच्या माहितीत भारतीय चाहत्यांना मोठी भेट देण्यात आली आहे. पहिल्यांदाच, भारतीय चाहत्यांना 9 वेगवेगळ्या भाषांमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. भारतात, सामन्यांचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 19 आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाईल. याशिवाय, सामन्यांचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅपवर केलं जाईल ज्यात चाहते इंग्रजी, हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलगू आणि कन्नड या 9 भाषांमध्ये समालोचनाचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय, चाहत्यांना मल्टी-कॅम फीडचाही आनंद घेता येईल.
CHAMPIONS TROPHY COMMENTARY WILL BE IN 9 LANGUAGES IN JIOHOTSTAR:
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2025
- English, Hindi, Marathi, Haryanvi, Bengali, Bhojpuri, Tamil, Telugu & Kannada. pic.twitter.com/azyw4FNhkG
चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला मिळतील सुमारे 20 कोटी : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी, ICC नं बक्षीस रकमेच्या बाबतीतही आपला खजिना उघडला आहे, जो गेल्या वेळेच्या तुलनेत 53 टक्क्यांनी वाढला आहे. 2025 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला सुमारे 20 कोटी रुपये मिळतील, तर उपविजेत्या संघालाही सुमारे 10 कोटी रुपये मिळतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व संघांना किमान 1 कोटी रुपये मिळतील.
हेही वाचा :